ओएनजीसी, गेल, इंडियन ऑईल कंपन्यांना सलग तिसऱ्यांदा दंड

नवी दिल्ली- तेल आणि गॅस क्षेत्रातील दिग्गज सार्वजनिक कंपन्या इंडियन ऑईल, ओएनजीसी आणि गेल इंडिया यांना त्यांच्या संचालक मंडळावरील अनिवार्य संख्या पूर्ण न केल्याबद्दल सलग तिसऱ्या तिमाहीत दंड ठोठावण्यात आला आहे.

शेअर बाजारावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तेल शुद्धीकरण आणि इंधन विपणन कंपन्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एक्सप्लॉरर्स ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आणि ऑइल इंडिया लिमिटेड,गॅस कंपनी गेल आणि तेल रिफायनरी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडला एकूण ३२.५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शेअर बाजाराकडे स्वतंत्र फाइलिंगमध्ये सर्व कंपन्यांनी ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत आवश्यक स्वतंत्र संचालक किंवा अनिवार्य महिला संचालक नसल्याबद्दल बीएसई आणि एनएसईद्वारे लादलेल्या दंडाचा तपशील दिला. दरम्यान,या कंपन्यांनी मात्र, संचालकांची नियुक्ती सरकारनेच करायची असून त्यात त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले. गेल्या दोन तिमाहीतही याच कारणामुळे कंपन्यांना दंडाला सामोरे जावे लागले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top