कबुतरांना दाणे टाकल्यास
पुण्यामध्ये ५०० रुपये दंड!

पुणे- राज्यभरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असताना अनेक पक्षीप्रेमी सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालत आहेत. अशा पक्षीप्रेमींना सध्या मात्र पालिका प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पुणे महापालिकेने या कारवाई मोहीम मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील कल्याणीनगर येथील मेरीगोल्ड सोसायटीत राहणार्‍या एका रहिवाशाला खायला देताना रंगेहाथ पकडून ५०० रुपये दंड वसूल केला.पालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वछता निरीक्षक मुकुंद घम यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे खायला घालण्याची लोकांना सवयच झाली आहे.त्यांना रोखल्यास लोक अधिकाऱ्यांशी वाद घालतात.तरीही आम्ही त्यांना आरोग्याच्या धोक्याबद्दल सांगतो आणि त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतो.आतापर्यंत आम्ही १० जणांना असा दंड ठोठावला आहे.

Scroll to Top