कराड तालुक्यात भीषण अपघात! जत्रेला चाललेले तिघेजण ठार!

कराड – कराड तालुक्यातील उंडाळे भागातील येणपे-लोहारवाडी येथे रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला.

या अपघातातील मृतांची नावे – सुवर्णा सुरेश महारुगडे,सुरेश सखाराम महारुगडे आणि समीक्षा सुरेश महारुगडे अशी आहेत, मृत सुरेश यांचा मुलगा समर्थ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातग्रस्त महारुगडे कुटुंब हे मूळचे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील पनुदरे आहे. सध्या ते पुण्यात राहतात. हे कुटुंब आपल्या गावातील वार्षिक जत्रेसाठी पुण्याहून रिक्षाने गावाकडे चालले होते.त्यावेळी त्यांची रिक्षा येणपे गावच्या हद्दीत लोहारवाडी येताच ट्रॅक्टरला धडकली.यात तिघांचा जागीच मृत्यू झाला,तर एक मुलगा गंभीर जखमी झाला.

Scroll to Top