नांदेड:
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता ही घडली. राहुल प्रकाश कांबळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सरसम (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे शेतकरी राहुल प्रकाश कांबळे यांनी नापिकीमुळे तसेच गारपीठीमुळे झालेल्या नुकसानला कंटाळून शेतात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अगोल प्रकाश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.