नांदेड
नांदेडमध्ये एका तरूण शेतक-याने आत्महत्या केली. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. ही घटना रविवारी घडली. शिवाजी दत्ताराम गाढे (२८) असे या शेतकर्याचे नाव आहे. ते नांदेड जिल्हयातील सिंधी येथे आपल्या कुटुंबासमवेत राहात होते.
गाढे यांनी शेतातील सततच्या नापिकीमुळे व ग्रामीण बँकेतून घेतलेल्या कर्जाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. रविवारी रात्री १ च्या सुमारास राहात्या घरी छताच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पांडुरंग दत्ताराम गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गाढे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.