कल्याण:- कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे करायचे आहे. या कामासाठी येत्या मंगळवारी (ता.१४) कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या भागात पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदी काठच्या बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरकण केंद्र आणि मोहने येथील उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिकी देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने १४/०३/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व पश्चिम / ग्रामिण व डोंबिवली पूर्व व डोंबिवली पश्चिम परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.