- ७३ टक्के भूसंपादन पूर्ण
मुंबई – मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते कसारा दरम्यान सुरू असलेल्या तिसर्या मार्गिकेच्या कामाला आता वेग येऊ लागला आहे. कारण आतापर्यंत या कामासाठी ७३ टक्के म्हणजेच ३५.९६ हेक्टर भूसंपादन पूर्ण झाले आहे. अवघे २७ टक्के भूसंपादन बाकी आहे.उरलेले हे १३.२७ हेक्टर भूसंपादनही लवकरच पूर्ण होणार आहे. या एकूण कामासाठी ७९२.८९ कोटी रूपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे.
ही तिसरी रेल्वे मार्गिका ६७.३५ किमी लांबीची असून त्यासाठी एकूण ४९.२३ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. २०२६ मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. कल्याण-कसारा दरम्यानची ही तिसरी मार्गिका २३ गावांमधून जाणार आहे. यापैकी १४ गावातील सरकारी जमीन रेल्वेने ताब्यात घेतली आहे. आता कल्याण,शहापूर आणि उल्हासनगर आदी ठिकाणचे काही खासगी भूसंपादन करणे बाकी आहे.