मुरबाड –
कल्याण मुरबाड रेल्वेमार्ग भूसंपादन मोजणी काम सुरू झाले आहे. यामुळे कल्याण मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामाला वेग आल्याचे दिसत आहे. या रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन रेल्वे भूसंपादित करणार आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना दिलेली तारीख व ठरलेल्या वेळेवर जागेवर मोजणी कामी उपस्थित राहण्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी कल्याण अभिजीत भांडे पाटील यांनी गावच्या तलाठी मार्फत व गाव चावडीवर नोटीस लावून सूचित केले आहे
या रेल्वे प्रकल्पा साठी लागणाऱ्या मोहने, अटाळी, आंबिवली, बल्यानी, मोहीली, उंभारणी, मानिवली, रायते, गोवेली, रेवती, नवगाव, कोलंब, केळनी, मामनोली, पोटगाव, घोरले, नांदेनी, पशेनी तर्फे मुरबाड देवपे तर्फे मुरबाड देवगाव, माळीनगर शास्त्रीनगर, मुरबाड या गावांतील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण मुरबाड रेल्वेला गती आल्याचे बोलले जात आहे. आता भूसंपादनाचा मोबदला किती मिळतो या विषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण मुरबाड रेल्वेमार्ग भूसंपादन मोजणी काम सुरू
