कवठे येमाई – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईत १८ मार्चला सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार गारांसह वादळी पावसाने अनेक ठिकाणी सुमारे १०० शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठेच नुकसान झाले आहे. याबाबत शिरूरचे कार्यतत्पर तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना वसुस्तीतीची माहिती तात्काळ दिल्यानंतर त्यांनी लगेचच आदेश काढत पंचनामा करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.संप मिटल्याने आज सकाळीच गाव कामगार तलाठी ललिता वाघमारे,कृषी सहायक नंदू जाधव,ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी प्रत्यक्ष शेतावर जात पंचनामे सुरु केले आहेत.
वीजांचा कडकडाट, गारांचा मारा व पाऊस यात शेतात उभी असलेली कांदा, मका, गहू, हरभरा,तरकारी पिके ऊस व इतर पिकांचे मोठेच नुकसान झाले आहे. विशेषेकरून शेतात तयार झालेला कांदा,फळबागांचे मोठेच नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरु करण्यात आल्याने सरपंच सुनीता बबनराव पोकळे,श्रीकांत आरुडे व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पंचनामे झाल्यानंतर बाधीत शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी माजी सरपंच बी.एम. पोकळे यांनी केली आहे.
कवठे येमाईत शेतकऱ्यांचे