कांद्याची आवक वाढली
कमाल भाव १,४०० रु.

चाकण : – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली. तरकारी मालाची आवक वाढून भाव स्थिर राहिले. गुरांच्या बाजारात शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल ४ कोटी ६० लाख रुपये झाली.
चाकण मार्केट मध्ये या आठवड्यात कांद्याची आवक ८ हजार क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक १ हजार क्विंटलने वाढली व कमाल भाव १ हजार ४०० रुपयावरच स्थिर राहिले. बटाट्याची एकूण आवक २ हजार २५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने वाढली व भावात २०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव १ हजार ४०० रुपयांवरून १ हजार २०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ७५ क्विंटलने घटून लसणाचा भाव ७ हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३९५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५५ क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला ३ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Scroll to Top