कान –
कान चित्रपट २०२३ महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित ‘या गोष्टीला नाव नाही’, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित ‘टेरिटेरी’ आणि मंगेश बदर दिग्दर्शित ‘मदार’ या तीन चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने चित्रपट निवडीसाठी परीक्षण समिती तयार केली होती. या तज्ज्ञ समितीमध्ये अशोक राणे, मनोज कदम, डॉ. संतोष पाठारे, सचिन परब, उन्मेष अमृते, मंगेश मर्ढेकर, मनीषा कोरडे, अनिकेत खंडागळे यांचा समावेश होता.
यासाठी एकूण ३४ मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले. या तीन चित्रपटांत काही तांत्रिक समस्या आल्यास टाईमप्लस प्रॉडक्शनचा ‘गाव’ आणि परफेक्ट ग्रुप निर्मित ‘गिरकी’ हे चित्रपट पाठवण्यात येतील.