काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर
भीषण स्फोट, २ ठार, १२ जखमी

काबूल: अफगाणिस्तानमध्ये दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे जानेवारीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर मोठा स्फोट झाला होता. ज्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता. ११ जानेवारीचा हा स्फोट तालिबान सरकारला हादरवून सोडणारा आत्मघातकी हल्ला होता. हल्लेखोराने परराष्ट्र मंत्रालयाजवळ स्वत:ला उडवले होते. त्यांनतर आता अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली आहे. परराष्ट्र मंत्रालयाजवळ झालेल्या या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या रस्त्यावरील काबूलच्या मध्यभागी असलेल्या दौदझाई ट्रेड सेंटरजवळ हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही क्षणात तिथे झालेल्या या जोरदार धमाक्याने एकच गोंधळ उडाला. तालिबान सरकारने याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. एकीकडे हा आत्मघाती हल्ला असल्याचे बोललेले जात आहे. तर दुसरीकडे एक व्यक्ती येथे असलेल्या चेकपोस्टकडे धावताना दिसली, त्यानंतर हा भीषण स्फोट झाला. काबूल पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

Scroll to Top