कायमस्वरूपी युद्धबंदीची हमी द्या! अमेरिकेच्या प्रस्तावावर हमासची मागणी

जेरूसलेम – इस्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप धुमसत आहे.मात्र आता गाझामधील या युद्धाला विराम देण्याच्या अमेरिकेच्या योजनेला हमासने प्रतिसाद दिल्याचे वृत्त आहे.यासाठी इस्रायलने गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धविरामाचे वचन द्यावे असे हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिलेल्या प्रस्तावित युद्धविराम योजनेत सहा आठवड्यांच्या युद्धविरामाची मागणी करण्यात आली आहे.कतार आणि इजिप्त यांनी अमेरिकेसह, इस्रायल आणि हमास यांच्यातील वाटाघाटींमध्ये मध्यस्थी केली आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे पॅलेस्टिनी गटाने या प्रस्तावावर त्यांचे उत्तर दिले आहे.मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या निवेदनात, हमासने गाझामधील लढाई थांबवण्याचे आवाहन केले आहे.”आम्ही आमच्या पॅलेस्टिनी लोकांच्या हितसंबंधांना प्राधान्य देतो आणि गाझावर होत असलेल्या आक्रमणाला पूर्णपणे थांबविण्याच्या आवश्यकतेवर भर देतो,” असे हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद (पीआयजे) यांनी म्हटले आहे. तसेच हे युद्ध संपवणाऱ्या करारापर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक सहभाग घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top