नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया मनीलाँड्रिंगप्रकरणी काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांची ११.०४ कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यांच्या चार मालमत्तांपैकी एक मालमत्ता कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात आहे.
कार्ती यांच्या विरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत एक आदेश जारी केला आहे, अशी माहिती ‘ईडी’ने दिली. कार्ती यांना आयएनएक्स मीडियाप्रकरणी सीबीआय व ईडीने अटक केली होती. हे प्रकरण आयएनएक्स मीडिया प्रा. लिमिटेडकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पैसे मिळाल्याचे आहे.
कार्ती चिदंबरम यांच्यासंपत्तीवर ईडीची जप्ती
