कालीदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी हरेराम त्रिपाठी

नागपूर
वाराणशीच्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कलगुरू हरेराम त्रिपाठी यांची कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी त्रिपाठी यांची निवड जाहीर केली आहे.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.श्रीनिवास वरखेडी यांची दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठात कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर रामटेकचे पदरिक्त होते. प्रभारी कुलगुरू म्हणून मधुसूदन पेन्ना यांच्याकडे कार्यभार होता. त्यांंचे संस्कृत शिक्षण काशी येथे झाले असून भारतीय दर्शन, शांकर वेदान्त, न्यायशास्त्र, सांख्ययोग, न्यायवैशैषिक शास्त्रांमध्ये पारंगत असलेले त्रिपाठींनी आचार्य परीक्षेत सर्वाधिक सुवर्णपदके प्राप्त झाली. त्रिपाठींच्या कारकिर्दीची सुरुवात केंद्रीय संस्कृत विद्यापीठातून झाली असून त्यानंतर लालबहादूर शास्त्री विद्यापीठात सर्वधर्म विभागात प्रोफेसर,अधिष्ठाता आणि विभाग म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वाराणशीच्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात गेल्या दोन वर्षांपासून कुलगुरूपदी कार्यरत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top