मुंबई
मजबूत रस्ते बनवण्यासाठी रस्ते कामाचा अनुभव असलेल्या कंत्राटदाराला काम देणे अनिवार्य आहे. मात्र ज्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले, त्याच कंपनीला रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम देण्याचा घाट मुंबई महापालिका प्रशासनाने घातला आहे, अशी टीका माजी नगरसेवकांनी केली आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने मेट्रो रेल्वे कामाचा अनुभव असलेल्या कंत्राटदाराला रस्ते कामाचे कंत्राट दिल्याने पालिका प्रशासनाकडून नियमांना केराची टोपली दाखवली, असेल माजी नगरसेवकांने म्हटले आहे. रस्ते कामांचा अनुभव ग्राह्य न धरता ज्या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवला होता, त्याच कंपनीला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या अनुभवावर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या डागडुजीचे काम सोपवण्यात आले. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी १३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ज्या कंपनीच्या कामांबाबत महापालिका प्रशासन असमाधानी असताना काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला देण्याचा निर्णय प्रशासनाने का घेतला, असा प्रश्न माजी नगरसेवकांने उपस्थित केला.