मुंबई : २०२३सालासाठी ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर राजकुमार रावला ‘बधाई दो’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या कामगिरीबद्दल या अभिनेत्यांचे अभिनंदन होत असताना अनुपम खेर यांनी फिल्मफेअर पुरस्कारांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या चित्रपटांची कामगिरी चांगली झाली. मात्र, विवेक अग्निहोत्रींच्या अनुपम खेर अभिनित काश्मीर फाईल्स चित्रपटाला या पुरस्कारांमध्ये सात नामांकन असतानाही एकही पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आदर ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा छोट्या लोकांकडून ती मिळण्याची अपेक्षा ठेवू नका, अशी पोस्ट लिहिण्यात आली आहे.’ आता अनुपम खेर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘काश्मीर फाइल्स’ला फिल्मफेअर न मिळाल्याने अनुपम खेर नाराज
