कुडाळात १० लाखांच्या रस्त्याची चोरी झाल्याचा भाजपाचा आरोप

कुडाळ – शहरातील वाचनालय ते रहिवासी उदय नाडकर्णी यांच्या घरापर्यंत करण्यात आलेला रस्ता चोरीला गेल्याचा आरोप भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी केला आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्या ठिकाणी रस्ता नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या म्हणण्यानुसार, रस्ता चोरीला गेला या आरोपात काही तथ्य नाही.
कुडाळ शहरांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्यासाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र हा रस्ता त्या ठिकाणी बांधण्यातच आला नसल्याचे कागदपत्रावरून उघड करत या भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी घेऊन हा रस्ता चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की, या रस्त्यासाठी मंजूर असलेला निधी अन्यत्र खर्च करण्यात आला. या रस्त्याचे बिल एका महिन्याच्या आत ठेकेदाराला देण्यात आले. ज्या रस्त्यासाठी हा निधी मंजूर होता त्यासाठी खर्च करण्यात आलेला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top