कुरुक्षेत्र – कुरुक्षेत्र द्रोणाचार्य स्टेडियमवर झालेल्या रन फॉर युनिटी कार्यक्रमात धावत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा धावत असताना तोल जाऊन ते जमिनीवर पडले. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना सावरले.देशाचे माजी उपपंतप्रधान, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हरियाणा सरकारने प्रत्येक जिल्ह्यांत रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी कुरुक्षेत्र येथे नायब सैनी आले होते. या कार्यक्रमात अनेक धावपटू सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील शर्यतीला सैनी यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि ते स्वतःही धावले. ते धावत असताना त्यांच्या शेजारी धावणाऱ्या एका धावपटूचा चुकून त्यांना धक्का लागला. त्यावेळी सैनी यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना सावरताच ते लगेच उठले.
