तेहरान – कुवेतहून अमेरिकेतील ह्यूस्टनला तेल घेऊन जाणारे जहाज इराणने ताब्यात घेतल्याने अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. या जहाजात २४ भारतीय कर्मचारी अडकले आहेत. अमेरिकेच्या नौदलाने जहाज जप्त केल्याची माहिती दिली. इराणच्या सैन्याने सांगितले की, आम्ही तेलवाहू जहाज जप्त केले. कारण हे जहाज आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत इराणी बोटीला धडकले. तेव्हापासून बोटीवरील २ इराणी क्रू सदस्य बेपत्ता आहेत, तर अनेक लोक जखमी झाले आहेत.
ॲडव्हांटेज स्वीट असे या जहाजाचे नाव आहे. अमेरिकन नौदलाने याबाबत माहिती देताना सांगितले की, गुरुवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास जहाजाने आपत्कालीन स्थितीची माहिती दिली, तेव्हाच इराणच्या सैन्याने जहाज ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेने ८ पोसायडन सागरी टेहळणी विमान पाठवले. या विमानाने असा अहवाल दिला की. इराणी नौदलाने जहाज ताब्यात घेतले आहे. इराणची कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. ही कारवाई प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्यासाठी धोक्याची आहेत. इराणने तातडीने जहाज सोडावे. इराणने गेल्या २ वर्षांत ताब्यात घेतलेले हे पाचवे हे पाचवे व्यावसायिक जहाज आहे. इराणकडून जहाजे जप्त करणे आणि नेव्हिगेशन अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणे सागरी सुरक्षा आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे.