नवी दिल्ली :बृजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन मुलीसह सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दरम्यान ब्रजभूषण सिंह यांनी आरोप फेटाळले आहेत. मात्र ब्रजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आज सोमवारी दुपारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ नवज्योत सिंग सिद्धू यांनी कुस्तीपट्टूंची भेट घेतली.
कुस्तीपटूंच्या या विरोध प्रदर्शनाला आता राजकीय पाठबळही मिळत आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतरमंतरवर पोहोचून पाठिंबा दर्शवला, तर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली. त्यांनतर आता काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू कुस्तीपटूंना भेटले.