सिल्लोड- राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार जम्मू आणि काश्मिर दौर्यावर असताना नुकतीच एका हायटेक नर्सरीला भेट दिली आणि त्याबाबतची माहिती जाणून घेतली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे जम्मू आणि काश्मीरच्या अभ्यास दौर्यावर असून त्यांनी काल शनिवारी या राज्यातील सेंटर फॉर हॉर्टीकल्चर एक्सलन्सला भेट दिली. यावेळी त्यांनी चेरी,सफरचंद,अक्रोड,पेर आणि बदाम या फळांच्या हायटेक नर्सरीला भेट दिली. या नर्सरीमध्ये तब्बल १५ हेक्टर क्षेत्रात अक्रोडची लागवड करण्यात आली आहे. ही अक्रोडची कमी उंचीची झाडे आहेत. या आधुनिक पद्धतीच्या फळबागांच्या लागवडीबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तेथील कृषी संचालकांशी सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली.यावेळी त्यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीर राज्य कृषी संचालक डॉ.गुलाम रसूल मीर,सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ. नंदा,डॉ.हिलाल आणि डॉ.जगजीत हे उपस्थित होते.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जम्मूतील हायटेक नर्सरीला भेट
