ओटावा – कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया येथे शनिवारी दुपारी ‘ली’ वादळाचा तडाखा बसला. परिमाणी अमेरिकेच्या मेरिटाइम कॅनडा आणि न्यू इंग्लंडमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. या वादळामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हा स्कॉशियाच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यूएस नॅशनल हरिकेन सेंटरच्या म्हणण्यानुसार, नोव्हा स्कॉशियाची राजधानी हॅलिफॅक्सच्या पश्चिमेला सुमारे २१५ किलोमीटर अंतरावर ताशी ११० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. ‘ली’या वादळामुळे नोव्हा स्कॉशियाच्या समुद्र किनारी मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे जलसेवा रद्द करण्यात आली होती. तसेच झाडे उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. या वादळाचा विमानसेवेनवर देखील परिमाण झाला. नोव्हा स्कॉशिया हा प्रांत या वर्षीच्या उन्हाळ्यातील वणव्यापासून सावरत असतानाच वादळ येऊन धडकले. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
कॅनडावर ‘ली’ वादळाचे संकट! जनजीवन विस्कळीत! २ बळी
