साक्रामेंटो – अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या पेट्रोलिया येथे भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत १० किमी खोलवर होता. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तर कॅलिफोर्नियाच्या विरळ लोकसंख्येच्या प्रदेशातील शहरांत देखील हलके धक्के जाणवले. कॅलिफोर्नियामध्ये वरचेवर भूकंप होत असतात.
हा भूकंप पेट्रोलियाच्या पश्चिमेला १०८ किमी अंतरावर झाला. सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री १२: १४ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी सोलोमन बेटांवर भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. होनियारा येथील या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केलवर इतकी होती. रविवारी ९:१५ च्या सुमारास हे धक्के बसले. त्याचे केंद्र जमिनीच्या आत ८० किलोमीटर खोल होते. दरम्यान, प्रशांत महासागरात नुकताच ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्यानंतर बेट आणि महाद्वीपीय भागात स्तुनामीचा धोका वाढला आहे. याबाबत अमेरिकेतील अनेक भागात अलर्टही जारी करण्यात आला आहे.