केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा अचानक रद्द

नवी दिल्ली- भाजपच्या जनसंपर्क अभियानांतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. मात्र यामध्ये समाविष्ट असलेला अमित शाह यांचा १० जून रोजीचा मुंबई दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. यामागील नेमके कारण अद्याप भाजपकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईला येणार नसले तरी महाराष्ट्रातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोनपैकी एका जिल्ह्याला भेट देणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील जूनच्या तिसर्‍या आठवड्यात महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी लोकसभा मिशन अंतर्गत पंतप्रधान मोदींची जाहीर सभाही होण्याची शक्यता आहे. त्याच्या या सभेची तारीख आणि ठिकाण याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, सध्या भाजपवर नाराज असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपचे प्रभारी सरचिटणीस सी. टी. रवी हे भेटणार आहेत. या भेटीत ते पंकजा मुंडे यांच्या नाराजीचे कारण शोधणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top