मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. कांदिवली येथील आपल्या एका नातेवाईकांच्या लग्न समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत.
एक महिन्यातील अमित शहा यांचा हा दुसरा दौरा आहे. दोन आठवड्यापूर्वी नवी मुंबई येथील खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी ते महाराष्ट्रात आले होते. दिवसांपूर्वी अमित शाह हे नागपूर दौऱ्यावर येणार होते. परंतु पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्याने त्यांनी तो दौरा रद्द केला होता. आता ते मुंबई दौऱ्यावर येत असल्याने त्यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.