नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा नाहीच. दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू स्पेशल न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवली आली आहे.विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांनी आज हे निर्देश दिले. या सुनावणीवेळी केजरीवाल हे तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. ३१ जुलैला होणाऱ्या पुढील सुनावणीवेळी त्यांना याच पद्धतीने सहभागी करावे, अशा सूचना न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिल्या.राऊज एव्हेन्यू स्पेशल न्यायालयाने केजरीवाल यांच्यासह दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच बीआरएस नेत्या बी. कविता आणि मद्य घोटाळ्यामधील अन्य आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे.अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना २० जून रोजी कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला, मात्र उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.