नैरोबी – केनियातील मोंबासा शहरातील न्यायालयाने सुमारे १०९ लोकांवर उपासमारीमुळे ओढवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या प्रसिद्ध पाद्रीची जामिनावर सुटका केली आहे.पाद्री इझेकिएल ओडेरो यांना न्यायालयाने २२ हजार डॉलर्स किंवा ३० दशलक्ष शिलिंगचा बॉन्ड जमा करण्याचा किंवा वैयक्तिक १.५ दशलक्ष शिलिंग रोख जमा करण्याच्या हमीवर त्यांना जामीन मंजूर केला आहे.
न्यू लाइफ प्रार्थना केंद्र आणि चर्चचे प्रमुख इझेकिएल ओडेरो यांना अटक करण्यात आली होती.त्याच्या अनुयायांच्या सामूहिक हत्येशी संबंधित गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागणार आहे,असे गृहमंत्री किथुरे किंडिकी यांनी एका निवेदनात म्हटले होते.त्यांचे चर्च सील सध्या करण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात धार्मिक उपासमारीमुळे शेकडो लोकांचे मृत्यू झाले होते. चर्च पासून ६६ किमी अंतरावर असलेल्या जंगलात त्यांचे मृतदेह आढळून आले होते. धार्मिक नेत्यांच्या सूचनेवरून या लोकांनी उपाशीपोटी मरण पत्करले असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.याचप्रकरणी पाद्री चर्चचे प्रमुख इझेकिएल ओडेरो यांना अटक करण्यात आली होती. या निकालानंतर हे पाद्री नेहमीप्रमाणे पांढरा पोषाख परिधान करून एक मोठे बायबल हातात घेऊन न्यायालयाच्या मोकळ्या जागेत बसल्याचे अनेकांनी पाहिले.