केरळमध्ये साक्षरता कार्यक्रमात 108 वर्षांच्या आजी अव्वल

तिरुअनंतपुरम
तामिळनाडूतील 108 वर्षांच्या आजी केरळ सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या साक्षरता कार्यक्रमात पहिल्या आल्या आहेत. कमलाकन्नी असे या आजीचे नाव असून त्यांची ही हुशारी पाहून सर्वजण आर्श्चय व्यक्त करत आहेत.
कमलाकन्नींचा जन्म 1915 साली तमिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील कुंबममध्ये झाला असून त्यांनी आपल्या आयुष्यातील 80 वर्षे वेलचीच्या शेतात मजुरी करण्यात घालवली. शेतात काम करत असल्याने त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. दुसरी इयत्ता पास केल्यानंतर त्या कुटुंबासह वंदनमेडूमध्ये गेल्या. तेथे त्या वेलचीच्या शेतात काम करू लागल्या. केरळ सरकारने राबवलेल्या संपूर्ण शास्त्र साक्षरता कार्यक्रमात त्या शिक्षण घेत आहेत. कमलाकन्नी यांनी या साक्षरता कार्यक्रमात अव्वल नंबर पटकाविला. आजीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top