नाशिक : वडाळा गाव चौफुलीवर असलेल्या भारत कॉटन सेल्स कारखान्याला सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. या आगीत ३० ते ४० लाखांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी दहा अग्निशामन दलाच्या गाड्या पोहोचल्यानंतर दीड तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
रहेमतनगर मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा गादीचा कारखाना आहे. कारखान्याचे मालक निसार शेख यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आग लागल्याचे लक्षात आले.त्यांनी तातडीने तेथे धाव घेत फायर स्प्रेने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. तातडीने अग्निशामन दलाला कळविले. सिडको, सातपूर, नाशिक रोड, पंचवटी, शिंगाडा तलाव आदी ठिकाणच्या अग्निशामन केंद्रातून सुरवातीला सहा बंब येथे आले. मात्र गाड्या घटनाथली दाखल होईपर्यंत कापूस आणि कापडामुळे अवघ्या काही मिनिटात संपूर्ण कारखाना आगीत जळून खाक झाला.