पुणे- गणेश खिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या प्रकरणातील आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामध्ये अटक केलेल्या एकूण १८ पैकी ११ आरोपींना न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बँकेच्या मुख्यालयातील बँकेचा स्विच सर्व्हर हॅक करून तब्बल ९४ कोटी ४३ लाखांचे रुपये काढून घेतले होते.
गणेशखिंड येथील कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयात ११ ते १३ ऑगस्ट २०१८ या कालावधीमध्ये सायबर चोरट्यांनी मुख्यालयातील एटीएम स्वीच हॅक करून तीन दिवसात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी रक्कम लुटली होती. त्यापैकी बहुतांश रक्कम भारतासह २६ देशांमधील एटीएममधून काढण्यात आली होती. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेममधील ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करून ते काढून घेतले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून आत्तापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. संबंधित प्रकरण पुणे सत्र न्यायालयात दाखल होते. सायबर पोलिसांकडून आरोपी विरुद्ध पुरावे सादर करून आपली बाजू मांडण्यात आली होती. त्यानुसार, या प्रकरणामधील आरोपींना न्यायलयाने शनिवारी चर वर्षपर्यंतची शिक्षा सुनावली आहे.
कॉसमॉस बॅंक सायबर हल्लातील अकरा आरोपींना चार वर्षांची शिक्षा
