मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने आणखी एक स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. ही मुंबई छशिमट- कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन निर्धारित स्थानकातून 4 आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कुडाळकडे प्रवास सुरु करेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता कुडाळला पोहोचेल. तर कुडाळ- मुंबई छशिमट (विशेष) अनारक्षित निर्धारित स्थानकातून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे 4.30 वाजता प्रवास सुरू करून त्याच दिवशी सायंकाळी 4.40 वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीला 20 कोच असून त्यापैकी 14 कोच जनरल श्रेणीतील असतील, तर चार कोच स्लीपर असतील.
.