मुंबई
कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने आणखी दोन स्पेशल ट्रेन सोडून सोय केली आहे.त्यामुळे परतीच्या गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहिती नुसार गाडी क्रमांक ०१५९२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी वन वे स्पेशल-गाडी क्रमांक ०१५९२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी वन वे स्पेशल मडगाव जंक्शन येथून सुटेल. 24/09/2023, रविवार रोजी सकाळी 07:30 वाजता सुटेल आणि ती ट्रेन मुंबई सीएसएमटीला त्याच दिवशी 22:55 वाजता पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, मडुरे, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, येथे थांबेल. पनवेल, ठाणे आणि दादर स्टेशन्स व शेवटी सीएसटीम येथे थांबेल.
डब्याची रचना: एकूण 18 एलएचबी कोच = दुसरी सीट (आरक्षित) – 08 कोच, सामान्य – 08 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
२) गाडी क्र. 07102 खेड – पनवेल मेमू स्पेशल (अनारक्षित):गाडी क्र. 07102 खेड – पनवेल मेमू स्पेशल (अनारक्षित) खेड येथून 24/09/2023, रविवार रोजी 15:15 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 19:45 वाजता पनवेलला पोहोचेल.
कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड आणि रोहा स्थानकावर गाडी थांबेल.
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर आज दोन स्पेशल गाड्या सोडणार
