मुंबई – महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून कोकणातील रत्नागिरीतील गणेशगुळे आणि सिंधुदुर्गातील विजयदुर्ग येथील समुद्र किनारपट्टीवर खोल पाण्याचे दोन नवीन ग्रीन फिल्ड बंदर उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे.त्यासाठी जागेची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.प्राथमिक स्तरावर या दोन किनारपट्टीची निवड करण्यात आली आहे.
या प्रस्तावानुसार लवकरच या बंदरांची व्यवहार्यता आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाणार आहे.विशेष म्हणजे कोकणातील आजवरच्या अनुभवानुसार या प्रकल्पांना उद्भवणारे संभाव्य धोके आणि त्याचे निवारण उपाय हे देखील निर्धारित केले जाणार आहे.तसेच या बंदरांशी सुलभ दळणवळण व्यवस्था राबविण्यासाठी रस्ते आणि रेल्वे मार्ग आवश्यक आहे.तसेच इतर सर्व बाबींचा विचार करून संबंधित सल्लागार कंपनी ६ महिन्यात आपला अहवाल सादर करू शकेल.खोल पाण्यातील ग्रीन फिल्ड बंदरामुळे लॉजिस्टिक सुविधा आणि मालवाहतूक रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.तसेच शेती आणि मासेमारी व्यतिरिक्त क्षेत्रात रोजगार निर्माण करता येणार आहे. या नवीन ग्रीन फिल्ड बंदरात कंटेनर टर्मिनल,गोदामे आणि अन्य बाबींसाठी आधुनिक उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिली. दरम्यान,सध्या महाराष्ट्रात सुमारे ७२० किमी लांबीच्या किनारपट्टीवर मुंबई बंदर आणि जेएनपीटी बंदर ही दोन प्रमुख बंदरे आहेत.तर ट्रॉम्बे,बेलापूर,बाणकोट, तारापूर,दाभोळ,दिघी, डहाणू,केळशी,रेवदंडा, रत्नागिरी आणि जयगड अशी एकूण ४८ छोटी बंदरे आहेत.
कोकणात खोल पाण्याची दोन ग्रीनफिल्ड