मुंबई – कोकणात गणपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही टोलमाफी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान लागू असेल. यासंदर्भातील सरकारी परिपत्रकात म्हटले आहे की, ”२०२३ च्या गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने १६.०९.२०२३ ते १.१०.२०२३ या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या गाडयांना टोलमाफी
