कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष
पालख्या घरोघरी पोहोचल्या

रत्नागिरी
कोकणात शिमगोत्सव मोठ्या थाट्यात सुरू आहे. अनेक गावांतील देवीच्या पालख्या ढोलताशांच्या तालावर घरोघरी पोहोचत आहेत. यावेळी संस्कृतीचे दर्शन घडवत ग्रामस्थ शिमगोत्सव साजरा करत आहेत. पुढील आठवडाभर रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील गावेगावी या शिमगोत्सव पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चाकरमानी आपल्या गावी पोहोचले आहे.
बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. आज पहाटे तीन वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा आणि होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगाव सहाणेवरून झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदर रोडमार्गे पहाटे पाच वाजता मांडवी भडंग नाख्यावर आली. तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपे वठार मागील समुद्रमार्गाने जाऊन पुढे शेट्ये यांच्या घराजवळ रस्त्यावर येऊन खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी 10 वाजता आली. तेथून ही पालखी तेलीआळी भागातून, रामनाका, राममंदिर येथे सकाळी 11:30 वाजता आली. श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव 11 मार्चपर्यंत चालणार आहे.

Scroll to Top