कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा अलर्ट

मुंबई :

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुढील ४ ते ५ दिवसांचा पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसहर पाऊस पडत आहे. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्वदूर दाखल झालेला नाही. नंदुरबार, पूर्व विदर्भात अजून मान्सूनची प्रतिक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करावी. आता खरीप हंगामातील पिकांसाठी पेरणी महत्त्वाची आहे. कारण जर पेरणी केली आणि पावसाने दडी मारली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top