कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला

पाटण – महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या कोयना परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरण क्षेत्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. या परिसरात पाऊस सुरू असल्याने धरणात प्रतिसेकंद ४ हजार १६८ क्युसेक इतके पाणी जमा होत आहे.
या धरणात आतापर्यंत ८५.५२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण जवळजवळ ८० टक्के भरले आहे. पुढचे दोन दिवस असाच दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. कोयना धरणात सध्या उपलब्ध असलेल्या ८५.५२ टीएमसी असलेल्या पाणी साठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ८०.५२ टीएमसी इतका आहे. पाटण तालुक्यातील महाबळेश्वर, नवजा, कोयना या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. या धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top