कोल्हापूर पालिका परिवहन
कर्मचार्‍यांचा संप मिटला !

कोल्हापूर- कोल्हापूर महापालिका प्रशासनाने केएमटी अर्थात कोल्हापूर महापालिका परिवहन कर्मचा-यांच्या मागण्यांना तत्वतः मान्यता दिल्याने काल शुक्रवारी रात्री उशिरा कर्मचा-यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. त्यामुळे काल दिवसभर ठप्प झालेली कोल्हापुरातील केमटीची बस सेवा आजपासून सुरू झाली आहे.
सातवा वेतन आयोग लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी केएमटीच्या कर्मचा-यांनी शुक्रवारी संप पुकारला होता.यामुळे काेल्हापूरातील बस सेवा ठप्प झाली हाेती. परिणामी हजारो प्रवाशांचे हाल झाले. संपूर्ण शहरात दिवसभरात ४० ते ५० हजाराहून अधिक नागरिक केएमटीतून प्रवास करतात.त्यामुळे संपाच्या महापालिका प्रशासनाने आंदाेलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.या चर्चेनंतर केएमटीच्या कर्मचा-यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या महापालिकेने तत्वत: मान्य केल्याने रात्री उशिरा हा संप मागे घेण्यात आलेला आहे.
सातवा वेतन आयोग प्रस्ताव ३० एप्रिल पूर्वी राज्य शासनाला पाठवणे,रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव १५ दिवसात तयार करणे, २५ महागाई भत्ता एप्रिल मे मधील पगारात समाविष्ट करणे, के बॅचमधील कर्मचाऱ्यांचा सी बॅचमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे,बसचे वेळापत्रक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयार करणे या मागण्या केएमटीच्यावतीने करण्यात आलेल्या आहेत.

Scroll to Top