नवी दिल्ली – भारतीय किक्रेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँने सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली आहे. मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. हसीन जहाँने तिच्या याचिकेत कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. यामध्ये शमीविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. शमीची पत्नी हसीनने आता त्याच्या अटकेसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
हसीन जहाँचे वकील दीपक प्रकाश, नचिकेत वाजपेयी आणि दिव्यांगना मलिक वाजपेयी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शमी तिच्याकडून हुंडा मागायचा आणि परदेश दौऱ्यावर वेश्यांसोबत अवैध संबंध ठेवायचा, असे तिने याचिकेत म्हटले आहे. शमी जेव्हा परदेश दौऱ्यावर असायचा तेव्हा तो मुलींना बीसीसीआयने दिलेल्या हॉटेलच्या रूममध्ये बोलवत असे. तो आजही वेश्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्यासोबत तो बोलतो, यासाठी तो दुसऱ्या मोबाईल नंबरचा वापर करतो.
कोणत्याही सेलिब्रिटीला कायद्यानुसार मोहम्मद शमीला विशेष दर्जा मिळू नये. सत्र न्यायालयाचा हा स्थगिती आदेश चुकीचा आहे. या केसमध्ये चार वर्षांपासून प्रगती झाली नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे.