ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान समर्थकांकडून हिंदू मंदिराची पुन्हा तोडफोड केल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडल्याचे उघडकीस आले आहे. खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेन येथील प्रसिद्ध श्रीलक्ष्मी नारायण मंदिराची आज तोडफोड केली. मंदिराचे अध्यक्ष सतींदर शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे.ते म्हणाले की, सकाळी भाविक पूजेसाठी मंदिरात पोहोचले,त्यावेळी त्यांना मंदिराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले.
हिंदू ह्युमन राइट्सच्या संचालिका सारा गेट्स यांनी सांगितले की,शिख फॉर जस्टिसच्या धर्तीवर हा द्वेषपूर्ण गुन्हा करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना घाबरवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. याआधी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कॅरम डाऊन भागात असलेल्या श्री शिव विष्णू मंदिर आणि मिली पार्क परिसरातील स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. मेलबर्नमधील इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली.