मुंबई:
अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान गंभीर दुखापत झाली होती. अभिनेते अमोल कोल्हे यांनी पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो रुग्णालयातील आहे.
आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात की, ‘काळजी करण्यासारखे काही नाही पुढे झेप घेण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते! थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू ” 11 मे ते 16 मे” हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे “शिवपुत्र संभाजी” महानाट्य!!!’ अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही कमेंट त्यांना ‘सगळे ठीक ना!’ असे विचारले आहे. अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या तसेच कलाकारांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. लवकर बरे होण्याच्या सदिच्छाही दिल्या आहेत.