चाकण :
रानमेवा खाण्यासाठी खेड तालुक्याच्या ( जि. पुणे ) पश्चिम भागात अनेक जन आवर्जून भेट देत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात रानमेवा पिकू लागला आहे. गडद पंचक्रोशीत हा रानमेवा उपलब्ध होऊ लागला आहे. पश्चिम आदिवासी भागात प्रथम रानात तोरणं पिकतात. मग करवंदीच्या जाळ्या करवंदांनी डवरतात, या डवरलेल्या जाळ्या सृष्टीचे सौंदर्य वाढवत असतात . करवंदांसोबतच आंबे सुद्धा पिकले आहेत. या भागात अनेक जांभळाची झाडे असल्या मुळे यथेच्छ पिकलेली जांभळे खाण्यास मिळतात. गरीबांचे खजुर म्हणजे शिंदपाड देखील या दरम्यान पिकतात. दरम्यान याच हंगामात येणारे भरपूर लोह देणारे फळ म्हणजे अळू मानले जाते. कॅडबरीच्या रंगाचे टोमॅटोच्या आकाराचे एक अवीट चवीचे फळ आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात रानमेवाचा स्वाद चाखण्यासाठी खवय्ये आवर्जून येऊ लागले असल्याचे गडद येथील रहिवासी सुभाष तळेकर यांनी सांगितले.
खेडच्या पश्चिमेला रानमेवा पिकला
