गडचिरोली – भूसुरुंगाच्या स्फोटात 11 जवानांचा बळी घेणार्या नक्षलवाद्यांचा बदला घेण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना आज यश आले आहे. आज भामरागडच्या जंगलात नक्षलवाद्यांबरोबर सुरक्षादलाच्या जवानांची चकमक झाली. यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मृत नक्षलवाद्यांमध्ये नक्षली कमांडर विटळू मडावी याचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दमरेचा या महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील जंगलात नक्षलवादी त्यांच्या आगामी शिबिराची तयारी करीत असल्याची माहिती नक्षलवाद विरोधी सी -60 पथकाला मिळाली. ही माहिती मिळताच आज सायंकाळी 7 वाजता या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन नक्षलवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना शोधण्यासाठी आता कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी रस्त्यावर पेरलेल्या स्फोटकांचा स्फोटात 11 जवान शाहिद झाले होते. त्यांच्या मृत्यूचा अखेर बदला घेण्यात आला
गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा
