नवी मुंबई- गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्सने किती दर आकारावेत याबाबतचे दरपत्रकही आरटीओने जारी केले आहे. यामुळे प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे.मुंबईत स्थायिक असलेल्या प्रत्येक कोकणवासीयांची लगबग सुरु असते. गणपतीला गावी जाण्यासाठी अनेकजण रेल्वे आणि एसटीचे सहा महिने आधी बुकिंग करतात. ऐनवेळी गावी जाण्याचे नियोजन केले तर बुकिंग मिळणे हे कठीण होते. तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून अनेक वेळा दुप्पट पैसे आकारले जातात. याच पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सने किती दर आकारावेत याचे दरपत्रक आरटीओने जारी केले आहे.
गणेशोत्सवात ज्यादा शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई
