पणजी
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर केला जातो. मात्र, या फटाक्यांचे घातक परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नवीन निर्देश दिले आहेत. त्यानुसार उत्तर गोव्याच्या सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमलने निर्बंध जारी केले आहेत. यात गणेशोत्सवासह दिवाळी व इतर सणांदिवशी रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना फटाके फोडण्यासंदर्भात निर्देश जारी केले होते. त्यात नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या काळात मध्यरात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडण्यावर बंदी घातली आली होती. नियमभंग झाल्यास त्या भागाचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस स्थानकाचे अधिकारी जबाबदार राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. याच मुद्द्याला अनुसरून आता गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणांनाही फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तशी सूचना सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमलद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.