गांधीनगर :
सुरत महापालिकेतील सर्वात जुने असलेल्या गांधी बागेत पुन्हा ‘पुष्पा’ स्टाईल चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. गुरुवारी रात्री बागेच्या सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून गेटसमोरील चंदनाचे झाड चोरट्यांनी इलेक्ट्रिक कटरने तोडले आणि पळवून नेले. त्यामुळे आता पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, याआधी दोन वर्षांपूर्वी याच बागेतील २ चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरली होती.
गांधीबाग ही ब्रिटिश काळातील सर्वात जुनीआणि ऐतिहासिक वास्तू आहे. या बागेत सातत्याने चंदन चोरीच्या घटना होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे गांधीबागेत सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या कमकुवत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे म्हणतात की, पालिकेने चंदन चोरांना पकडण्यासाठी ही झाडे उभारली होते. मात्र पुष्पा चित्रपटात ज्या पद्धतीने चंदनाच्या झाडांची चोरी केली जाते त्यापद्धतीनेच येथे चोरी झाली. सध्या या बागेत केवळ ८ चंदनाची झाडे उरली आहते.