गाझियाबाद : गेल्या दोन दिवसांपासून गाझियाबाद मध्ये पारा ४३ वर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे येथील नागरिकांना उष्माघात सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. अचानक तापमानात वाढलेल्या बदलामुळे रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. उष्णतेमुळे आजारी पडलेल्या सुमारे ११०० रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्येही दाखल करण्यात आले आहे.
सन स्ट्रोक किंवा उष्माघात ही एक गंभीर बाब असल्याचे एमएमजी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. आलोक रंजन म्हणाले. सध्या त्याचेच रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने ही स्थिती प्राणघातक ठरू शकते अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. औषधांचा पुरेसा साठा तसेच वॉर्ड सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. लोकांनी बाहेर पडताना कापडी टोप्या किंवा छत्री वापरावी असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. ओआरएस द्रावण, फळांचा रस, नारळपाणी यांचे शक्य तेवढे सेवन करा अशा सूचना देखील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
गाझियाबाद मध्ये उष्णतेची लाट! हजारो लोक रुग्णालयात दाखल
