अहमदाबाद – गुजरातमधील सरकारी कर्मचार्यांना आता ’जिओ’ची सुविधा वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुजरात सरकारने वोडाफोन, आयडियाची सेवा बंद केली आहे. त्यामुळे या सगळ्या कर्मचार्यांचे फोन नंबर जिओमध्ये रूपांतरित करण्यात आले. 8 मे रोजी गुजरात सरकारने एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार सरकारी कर्मचार्यांना 37.50 रुपयांमध्ये रिलायन्स जिओची मासिक भाडे योजना मिळणार आहे. या प्लॅनद्वारे सरकारी कर्मचार्यांना कोणत्याही मोबाईल ऑपरेटर, लँडलाइनवर मोफत कॉलिंग करता येईल. यासोबतच वापरकर्त्यांना दर महिन्याला 3 हजार मेसेज मोफत मिळणार आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत राज्य सरकारी कर्मचारी अधिकृतपणे वोडाफोन-आयडिया कंपनीचे पोस्टपेड मोबाईल नंबर वापरत होते. पण 8 मे रोजी गुजरात सरकारने एक अधिसूचना जारी करून तात्काळ प्रभावाने वोडाफोन आयडियाच्या जागी रिलायन्स जिओचा नंबर वापरण्यास सांगितले आहे.
गुजरातच्या सरकारी कर्मचार्यांना ‘जिओ’ वापरणे बंधनकारक
