गोंदिया – जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सगळे शासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचा फटका आता सर्वसामान्य लोकांना बसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या आठ गावांना या संपाचा फटका बसला. मागील चार दिवसापासून या गावात पाणी पुरवठा होत नाही. चार दिवसपासून नगर परिषदद्वारे लावण्यात आलेले नळाला पाणी येत नसल्याने आठ गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागल आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरपर्यंत जावे लागत आहे. त्याचप्रमाणे विहिर किंवा बोरवेलने पाण्याची सोय करावी लागली.
या संपामध्ये नगर परिषदेचे कर्मचारी देखील सहभागी झाली आहेत. नगरपरिषदेद्वारे आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. या आठ गावातील लोकसंख्या ४० हजार असून, या सर्व लोकांना मागील चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. याचा महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने नगरपरिषद संघर्ष समितीने प्रशासक तहसीलदार यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. शिवाय पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. दरम्यान, विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या संपामुळे रुग्णांचे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.